आमंत्रण बॅनर — पहिले महिला शासकीय अधिकाऱ्यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली-२०२६

आपले सहर्ष स्वागत आहे
waving_handआपले सहर्ष स्वागत आहे

दिल्लीत जागर मराठीचा…

संदेश महाराष्ट्राच्या ऐक्याचा….

यंदाचे वर्ष भारताच्या इतिहासातील एक तेजस्वी व धगधगते पर्व असणाऱ्या महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंतीचे वर्ष आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर महाराणी ताराराणी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची सूत्रे समर्थपणे हाती घेतली.

या महाराणीच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी देशभरात विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सरहद संस्थेच्या वतीने, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने दिनांक ११ व १२ एप्रिल २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येत आहे.

हे संमेलन व त्याच्याशी निगडित सर्व घडामोडी, माहिती आणि संवादासाठी हे संकेतस्थळ आपल्या सेवेत सादर आहे. या माध्यमातून आपणही या ऐतिहासिक साहित्यक्षणांचे साक्षीदार व्हा… त्यात सहभागी व्हा!


military_techउपराष्ट्रपतींचा संदेश

उपराष्ट्रपती मा. सी. पी. राधाकृष्णन यांचा संदेश

माननीय श्री. सी. पी. राधाकृष्णन, उपराष्ट्रपती भारत
माननीय श्री. सी. पी. राधाकृष्णन
उपराष्ट्रपती, भारत

छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या प्रेरणादायी वारशाच्या स्मरणार्थ आयोजित पहिल्या अखिल भारतीय मराठी महिला अधिकारी साहित्य संमेलनाबद्दल मला अत्यंत आनंद वाटतो.

त्यांच्या धैर्य, नेतृत्व आणि दूरदृष्टीतून समावेशक राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा मिळते. हा उपक्रम साहित्य, प्रशासन आणि महिलांच्या सशक्त अभिव्यक्तीस नवे बळ देईल.

या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

mailशुभेच्छापत्र — उपराष्ट्रपती कार्यालय
auto_stories पूर्ण संदेश वाचा


lightbulb

साहित्य संमेलनाचा उद्देश व दृष्टी

मराठी भाषा, संस्कृती आणि संवेदनशीलतेचा ठसा आज देशभरातील विविध प्रशासकीय पदांवर कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांमधून ठळकपणे दिसून येतो. महाराष्ट्राबाहेरील राज्यांतील अनेक महिला अधिकारीसुद्धा मराठी भाषा आत्मीयतेने आत्मसात करून महाराष्ट्रातील शासकीय जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत.

या सर्व महिला अधिकारी साहित्य, विचार आणि सामाजिक जाणिवांच्या क्षेत्रातही मोलाचे योगदान देत आहेत. प्रशासनाच्या धकाधकीच्या जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून त्या लेखन, चिंतन आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून समाजमन समृद्ध करत आहेत.

अशा दुहेरी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या कर्तृत्ववान महिला अधिकाऱ्यांना समाजासमोर आदर्श म्हणून उभे करणे, त्यांच्या साहित्यिक व वैचारिक योगदानाचा गौरव करणे तसेच प्रशासन आणि साहित्य या दोन क्षेत्रांतील सुंदर समन्वय अधोरेखित करणे — हा या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रमुख हेतू आहे.


auto_storiesवाङ्मय वारसा

मराठी साहित्यविश्वातील स्त्री साहित्यरत्ने

मराठी साहित्याच्या दीर्घ आणि समृद्ध परंपरेत स्त्री साहित्यिकांनी आपल्या लेखणीद्वारे सामाजिक अन्यायाला आव्हान दिले, रूढी-परंपरांचे पुनर्मूल्यांकन केले आणि स्त्री-अस्तित्वाचे सशक्त भान निर्माण केले आहे. संत कवयित्रींपासून ते आधुनिक काळातील विचारवंत लेखिकांपर्यंत, स्त्री लेखनाने मराठी वाङ्मयाला संवेदनशीलता, बौद्धिक धार आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली.

कुसुमावती देशपांडे

कुसुमावती देशपांडे

(१९०४–१९६१)
event
४३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
ग्वाल्हेर – १९६१

मराठी साहित्यातील बहुआयामी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व. 'दीपकळी', 'मोळी', 'दीपदान' हे कथासंग्रह महत्त्वाचे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा.

दुर्गा भागवत

दुर्गा भागवत

(१९१०–२००२)
event
५१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
कराड – १९७५

लोकसाहित्य, लोकसंस्कृती व बौद्ध साहित्याच्या गाढ्या अभ्यासक. 'ऋतुचक्र', 'गोधडी', 'निसर्गोत्सव' मौल्यवान. पद्मश्री व ज्ञानपीठ पुरस्कार नाकारून वैचारिक स्वातंत्र्य जपले.

शांता शेळके

शांता शेळके

(१९२२–२००२)
event
६९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
आळंदी – १९९६

मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार. 'रेशमाच्या रेघांनी' ही अजरामर लावणी. कवितेत सौंदर्यदृष्टी, सहजता व मानवी भावविश्वाची खोल जाण.

विजया राजाध्यक्ष

विजया राजाध्यक्ष

(१९३३– )
event
७४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
इंदूर – २००१

स्त्रीवादी लेखिका व नामवंत समीक्षक. 'मर्ढेकरांची कविता' ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार. 'अधांतर', 'विदेही', 'हुंकार' कथासंग्रह विशेष उल्लेखनीय.

अरुणा ढेरे

डॉ. अरुणा ढेरे

(१९५७– )
event
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
यवतमाळ – २०१९

ज्येष्ठ लेखिका, कवयित्री व समीक्षक. 'विस्मृतिचित्रे' ग्रंथातून स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचे विस्मरणात गेलेले योगदान उजेडात आणले.

तारा भवाळकर

डॉ. तारा भवाळकर

(१९३९– )
event
९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
दिल्ली – २०२५

लोकसाहित्य, नाट्यसंशोधन व स्त्रीवादी अभ्यासाच्या अग्रणी विदुषी. 'सीतायन' ग्रंथातून पौराणिक कथांचे स्त्रीवादी पुनर्वाचन. मराठी विचारविश्वातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.


format_quoteशुभविचार

मान्यवरांचे शुभविचार

या ऐतिहासिक संमेलनासाठी देशभरातून आलेले शुभसंदेश.

सरहद